Monthly Archives: जुलै 2009

नंदन निलकेणींची – फुल्ली इंटिग्रेटेस कार्ड सिस्टम

नंदन निलकेणींनी प्रपोज केलेली सिस्टम भारतात लागल्यानंतर – काय होईल हे एका पिझ्झाच्या किस्यावरुन जाणुन घ्या. कदाचित हे संभाषण २०१५ सालचे आहे असे गृहीत धरुन चालु..

ओपरेटर – पिझ्झा हट ला फोन केल्याबद्द धन्यवाद! मी आपली काय सेवा करु शकतो?
कस्टमर – अं.. हां.. मला हवंय…
ओपरेटर – एक मिनिट सर, आपण मला आधी आपला बहुउद्देशिय कार्ड नंबर सांगाल का?
कस्टमर – हां. ओके.. ८८९८६१३५६१०२०४९९९८-४५-५४६१०
ओपरेटर – हां, मि. सिंग! आपणे १७, “जल वायु” मधुन बोलत आहात. आपल्या घरचा नं. २२६७८८९३ , औफिस नं. २५०७६६६६६ व मोबाइल नं. ०९८६९७९८८८८ आहे. आपण कोठुन बोलत आहात?
कस्टमर – घरुन! पण तुम्हाला हे सारे नंबर कुठुन मिळाले?
ओपरेटर – आम्ही “सिस्टमला” जोडलेलो आहोत, सर!
कस्टमर – ओके. मला एक सी-फुड पिझ्झा मागवायचा आहे.
ओपरेटर – माफ करा, पण आपणासाठी ही कल्पना चांगली नाही.
कस्टमर – कशी काय?
ओपरेटर – आपल्या मेडिकल रेकार्डस वरुन – आपल्याला हाय बी.पी. व हाय कॅलेस्टेराल आहे, सर!
कस्टमर – काय??….. अच्छा! मग काय मागवु?
ओपरेटर – एखादा लो-फॅट पिझ्झा ट्राय करा सर, आपल्याला आवडेल तो!
कस्टमर – लो-फॅट? तुम्हाला काय माहिती – मला आवडेल ते?
ओपरेटर – गेल्याच आठवड्यात आपण नॅशनल लायब्ररीमधुन “पौप्युलर डिशेस” चे पुस्तक आणले आहे, सर!
कस्टमर – ओके. ओके, ठीक आहे. बस्स आता! मला तीन फॅमिली साइजचे पिझ्झा द्या. कीती झाले त्याचे?
ओपरेटर – हां, आपल्या पाच लोकांच्या फॅमिलीसाठी हे पुरेसे आहे. सगळे मिळुन ५०० रु. झाले, सर!
कस्टमर – अच्छा. मी क्रेडीट कार्ड ने पे करु शकतो ना?
ओपरेटर – माफ करा – आपणास कॅश द्यावी लागेल, सर! आपले क्रेडीट कार्ड लिमिट्च्या वरती वापरले गेले आहे आणि गेल्या वर्षीच्या आक्टो. महिन्यांपासुन आपण बँकेचे २३०००.७५ देणे आहात. आणि यामध्ये आपल्या हाऊसिंग लोन चे लेट पेमेंट चार्जेस लावले नाहीत, सर!
कस्टमर – मला वाटतं, पिझ्झा येइइपर्यंत मी शेजारच्या ए.टी.एम. मधुन पैसे काढुन आणतो.
ओपरेटर – माफ करा, सर! पण आपण आपले आजचे “डेली विड्रावल” लिमिट पार केले आहे!
कस्टमर – ठीक आहे, माझ्याकडे तेवढी कॅश आहे. तुम्ही पिझ्झा पाठऊन द्या. कीती वेळ लागेल?
ओपरेटर – ४५ मि. सर! पण आपणास लागलीच हवा असल्यास – आपण आपल्या नविन नॅनो मधुन येऊन घेऊन जाऊ शकता!
कस्टमर – का…. य?
ओपरेटर – हां सर! आमच्या सिस्टमच्या रेकार्डनुसार – आपणाकडे महा.-०५-अब-११०७ नंबरची नॅनो आहे!
कस्टमर – ???
ओपरेटर – मी अजुन काही मदत करु शकतो, सर?
कस्टमर – काही नाही! अरे हां, त्या पिझ्झाबरोबर मला कोकच्या ती फ्री बाटल्या मिळतीलच ना?
ओपरेटर – हो सर, शक्यतो आम्ही देतोच. पण रेकार्डनुसार आपण डायबेटीक सुद्धा आहात!
कस्टमर – @#$@#$#$%@#$
ओपरेटर – तोंड सांभाळुन बोला, सर! १५ जुलै २०१० साली आपणास “शिविगाळ” केल्याप्रकरणी शिक्षा झाली होती, हे लक्षात आहे ना?
कस्टमर – चक्कर येऊन पडतो!!

मुळ पोस्ट

भगवद्‌गीता , recession touch!!

काय होईल जर कृष्ण सध्या परिस्थितीत एखाद्या कर्मचा-याला भेटला. कदाचित अर्जूनाप्रमाणेच तो त्याला देखील गीतेतला सार सांगेल. . .

पण त्यात थोडा बदल राहील, कदाचित खालिलप्रमाणे. . .हे पार्थ,

इनक्रिमेंट नाही झाले, वाईट झाले,
इन्सेंटिव नाही मिळाले, हे देखील वाईट झाले,
पगारात कपात होत आहे हे सुद्धा वाईट होत आहे.

तू मागचे इन्सेंटिव न मिळण्याचा पश्चाताप करू नकोस,
तू पुढच्या इन्सेंटिवची सुद्धा चिंता करू नकोस,
बस आपल्या वेतानात समाधानी रहा.

तुझ्या खिशातून काय गेले, जे तू रडतो आहेस?
जे काही मिळाले होते, ते इथूनच मिळाले होते. . .

तू जेव्हा नव्हता, तेव्हा देखील ही कंपनी चालत होती,
तू जेव्हा नसशील, तेव्हा देखील चालेल,
तू इथे काहीच घेऊन आला नव्हतास,
जो अनुभव मिळाला, इथेच मिळाला. . .
जे पण काम केलेस, ते कंपनी साठी केलेस,
डिग्री घेऊन आला होतास, अनुभव घेऊन जाशील. . .

जो संगणक आज तुझा आहे,
कालपर्यंत कुण्या दुस-याचा होता. . .
उद्या तो कुणाचातरी होईल, परवा आणखी कुणाचातरी होईल. . .
तू त्याला आपला समजून त्यामधे कशाला गुंततो आहेस. . . का सुखी आहेस. . .
हे सुखच तुझ्या समस्त चिंताचे मुळ कारण आहे. . .
का तू उगाच चिंता करतोस, का उगाच कुणाला भितोस,
कोण तुला काढू शकत. . . ?

सतत ‘नियम-परिवर्तन’, हा कंपनीचा नियम आहे. . .
ज्याला तू ‘नियम-परिवर्तन’ म्हणतोस, तेच तर खरे मृगजळ आहे. . .
क्षणात तू बेस्ट परफॉर्मर वा हीरो नंबर वन वा सूपरस्टार असतो,
आणि दुसा-याच क्षणी तू टार्गेट अचीव न करू शकणारा वर्स्ट परफॉर्मर बनतो. . .

अप्प्रैसल, इन्सेंटिव हे सर्व आपल्या मनातून काढून टाक,
विचारातून उडवून टाक,
मग बघ, कंपनी तुझी अन् तू कंपनीचा. . .
ना हे इनक्रिमेंट तुझ्यासाठी
ना तू इनक्रिमेंट साठी,

परंतु तुझा जॉब सुरक्षित आहे
मग कशाला उगाच काळजी करतोस. . . ?
तू स्वत:ला कंपनीसाठी अर्पण करून दे,
नको करू इन्सेमेंट ची चिंता. . . बस मन लावुन आपले काम कर. . .
हेच सर्वसत्य आहे!
जो हे सर्वसत्य जाणतो. . .तोच खरा सुखी. . .
तो ह्या रिव्यू, इन्सेंटिव, अप्प्रैसल, रिटाइरमेंट आदींच्या बंधनातुन मुक्त झालेला असतो. . .
तू सुद्धा मुक्त होण्याचा प्रयत्न कर आणि सुखी हो. . .

तुझाच कृष्ण . . .


मला आलेल्या हिंदी ईमेलवर आधारीत!खरे तर हिला मी विदर्भिय मराठीत तयार करणार होतो.

जसे…”कायले रडत बे?”, “अबे पोट्ट्या!”, वैगरे, पण सोडून दिले…कारण काही विदर्भिय शब्द कदाचित काही लोकांना खटाकले असते. जसे “कायले भोकाले…” ई. म्हणून साध्या मराठीतच अनुवाद केला आहे.