Monthly Archives: एप्रिल 2011

“He charged me 10 thousand, but for others it was 40.”

काही दिवसांपूर्वी माझ्या company मध्ये interview साठी एक उम्मेदवार आला होता. माझा Project Manager त्यावेळी हजर नसल्यामुळे, HR ने मला त्याच्या सोबत थोडा वेळ घालवायला सांगितलं…आता ती व्यक्ती आली होती Project Manager ला interview द्यायला…मी आपला त्याच्या सारखाच developer…conference room मध्ये गेल्यावर लगेच उठून मला अभिवादन करायला लागला…मनात म्हटलं चला थोड्या वेळा साठी का होईना Project Manager समजू दे ह्याला मला, खेचुयात जरा ह्याचीWink face…पण शक्य होईल तेव्हढ सरळ रहायचं हे स्वतःला दिलेलं वचन आठवलं आणि त्याला सांगून दिलं कि बाबा मी पण तुझ्या सारखाच developer आहे, PM( दरवेळी पूर्ण शब्द लिहिणं आता जीवावर येत आहे माझ्या) अजून यायचा आहे, तोवर आपण गप्पा मारुयात… त्याच्या पण चेहऱ्यावरचा ताण थोडा कमी झाला आणि आमच्या गप्पा सुरु झाल्यात…

तो तामिळ नाडू च्या कुठल्या तरी गावाचा होता….मला आधीच नावं आणि आकडे विसरायची सवय आहे, त्यात तमिळ नाडू मधलं गावाचं नाव लक्षात ठेवणं म्हणजे माझ्या साठी तर दिव्यच!!…त्याने सांगितल्या सांगितल्याच विसरलो होतो मी ते गावSmiley face…तर तो कुठल्या तरी गावाचा होता, वडील शेतकरी आहे असे सांगितलं त्याने, त्याच्या अवतारावरून घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असेल असं जाणवत होतं. आत्मविश्वास देखील जेमतेम बिचाऱ्याचा ( graduation होऊनही जर नोकरी मिळत नसेल तर हि अशीच हालत होते सगळ्यांची, हा विचार चटकन माझ्या डोक्यात आलाWink face )…. त्याने iPhone developer च्या जागेसाठी apply केले होते…मी त्याला विचारले, “So, how did you learn about iPhone programming? Did you learn on your own or you did some course?”….त्याने उत्तर दिलं, “Actually my friend is running one training institute, I learnt there.”….”Oh, is it!”, मी म्हटलं, “what was the course fee, there?”….”He charged me 10 thousand, but for others it was 40.”, त्याचे उत्तर. …मला धक्काच बसला ४० हजार ऐकून!!….”What was the duration of the course?”, मी कुतूहलाने विचारलं…”One month Sir.”, त्याने उत्तर दिलं. …मी चाटच पडलो राव!!! एका महिन्यात एका पोराकडून ४० हजार!!! अरे छपाई आहे कि काय आहे?…नंतर थोडा वेळ अजून बोललो त्याच्यासोबत, नंतर PM आला माझा, त्यांचा औपचारिक परिचय करून आणि त्याचा resume PM ला देऊन मी बाहेर निघून आलो ….त्याला नोकरी नाही मिळाली…PM च्या हिशोबाने तो अगदीच नवखा होता… आता दुसरा मुलगा आला आहे त्या जागेवर, MS करून आला आहे Sweden वरून. वडिलांनी परत बोलवले म्हणून देशात परत येऊन काम करतो आहे…. पण पक्का Sweden भक्त आहे बघा. कायम त्याचं Sweden पुराण सुरु असतं…”Sir do you know in Sweden….something something…”….. “And do you in Sweden …something something….” …..हे “something something” ऐकून ऐकून मला मात्र Sweden चा अक्षरशः राग यायला लागला आहे आता……. Orkut वर असतो तर ‘I hate sweden’ नावाची community नक्कीच join झालो असतो मी !Wink face

पण आधीच्या मुलाने सांगितलेली गोष्ट मी विसरू शकलो नाही अजून…४० हजार!! iPhone Programming मी सुद्धा शिकवलं आहे. इतका काही अबोधनीय पाठ्यक्रम नाही तो कि एव्हढे शुल्क घ्यावं कुणी पोरांकडून! …शिक्षण जरा जास्तच महाग होता चाललं आहे असे नाही वाटत का तुम्हाला? ….शिक्षणाच्या नावाखाली मस्त धंधा सुरु केलेला दिसतो आज काल सगळीकडे. मानलं… कि फुकट काहीच मिळत नसतं, आणि मिळायला देखील नकोच, नाहीतर त्या गोष्टीची किंमत राहत नाही समोरच्याला. पण म्हणून अतिरेक ही नको एखाद्या गोष्टीचा. वरच्या त्या मुलाने एका विद्यार्थ्याकडून घेतलेले ४० हजार मला अतिरेकी वाटतात. मानतो कि तो त्याच्या व्यवसाय आहे, त्याचे पण आयुष्य आहे, त्याच्या सुद्धा गरजा असतील, त्याला institute चालवायला सुद्धा खर्च येतच असणार, पण स्वतःच्या मित्राला १० हजारात शिकविलेच ना त्याने? आणि इतरांकडून त्याच्या ४ पट पैसे घायचे!! अंतर तर बघा! …कितीतरी लोकांचे वार्षिक उत्पन्न असेल ते, किंवा त्याहूनही जास्त…ठीक-ठाक कॉलेजचे वार्षिक शुल्क होईल तेव्हड्यात…अरे कसली हि शिक्षणाची महागाई? … आज कुणाला काही शिकायचे असेल तर गुणवत्ता असून काहीच होता नाही, जवळ असायाला पाहिजे तर पैसा! ….मी स्वतःला त्यामानाने नशीबवानच समजायला पाहिजे कि माझ्या वडिलांनी खर्च करून मला engineering साठी पाठवलं…कितीतरी लोकं असतील भारतात जे इच्छा असूनही पैशाभावी स्वतःच्या लेकाला पाठवू शकत नसतील शिक्षणासाठी…आणि ही वास्तविकता मी मध्यमवर्गीयांमध्ये बघितली आहे…गरीब लोकांचे तर हाल तर राहूच द्या…त्यांनी तर उच्च शिक्षणा बद्दल विचार करणंच पाप आहे…

आणि वरून नोकरी साठी पदवी असणंही फार गरजेचे आहे…आता समोरच्याकडे काम करण्याची आणि ते पूर्णत्वाला नेण्याची ऐपत आहे की नाही हे बघण्यापेक्षा… त्याच्या कडे पदवी आहे की नाही हे बघणं का महत्वाचं असतं हे नोकरी देणार्यांनाच माहित!… नाहीतर आजकाल जवळपास प्रत्येक अभ्यासक्रम online उपलब्ध आहे…नुसताच इंग्लिश मध्ये नाही, तर बोली भाषेतसुद्धा, अगदी निशुल्क!!…पण इथून तुम्हाला पदवी नाही मिळत ना ….म्हणजे शिक्षणाचा खर्च करणं आहेच प्रत्येकाला…आणि सध्या जशी परिस्थिती आहे तसेच सुरु राहिलं तर तो दिवस दूर नाही जेव्हा शिक्षण ही केवळ श्रीमंत माणसांच्या अवाक्यातली गोष्ट बनून राहील…कुणीतरी तर हे थांबवायला हवे ना?…घेणार्यानं नाहीतर देणार्यानं तरी…आम्ही डोळे झाकून computer engineering साठी जातो…paasout झाल्यानंतर साध्या C language मध्ये एक program सुद्धा धडाने लिहू शकू कि नाही ह्याचाही आत्मविश्वास आमच्यात नसतो …computer engineering सोडून बाकी सगळ्या गोष्टी आम्ही शिकलो असतो, आणि campus मधून placement नाही झालं तर बाहेर जाऊन नोकरी मिळवण्याची ताकद आमच्यात नसते…बाहेर निघून जेव्हा आम्ही कामाला जातो तेव्हा समजतं की आपण जे शिकलो ते तर १० वर्ष जुनं आहे सगळं….मग त्या अभ्यासक्रमाची किंमतच काय राहते आमच्या आयुष्यात?…आणि त्यासाठी इतके पैसे का मोजावे कुणी?…उगी सगळे जाताहेत म्हणून अमुक एक अभ्यासक्रम शिकायला आम्ही जातो आणि मग आम्हालाच जाणवतं की मला ही गोष्ट तर आवडतच नाही, ह्यात काय काम करणार मी आयुष्यभर…मग आम्ही परत दुसरा कुठला तरी अभ्यासक्रम निवडून post graduation करायला लागतो…आणि अश्यात ह्या शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या लोकांचा मस्त फावतं…आपण आपले पैसे भरत जातो…वेळ देत राहतो …आणि शेवटी कळत की जे मिळवलं, त्यामानाने जरा जास्तच देऊन बसलेलो असतो…

बडे मियां तो बडे मियां…छोटे मियां …

बऱ्याच महिन्यांपूर्वीची गोष्टं…त्यावेळी मी थोडासा निराश, खचलेला होतो… साडेसाती सुरु असावी माझी बहुतेक 😉 .माझ्या वडिलांची परिस्थिति सुधा काहीशी माझ्यासारखीच. ५५ वर्षाचा तो माणुस बँकेच्या रोजच्या नीरस जीवनाला, कामाला कंटाळलेला होता त्यावेळी. घराच्यापासून सतत दूर राहून थकलेला होता…”सोनू कामाला लागला कि मी मस्त निवृत्ती घेणार आणि आराम करणार!…बँकेच्या कामाला कंटाळलो बाबा…” असे ते सगळ्यांना सांगायचे…पण मी त्यांना हाथभार लावणे तर सोडा, स्वतःचेच आयुष्य स्थिर नाही करू शकलो…., म्हणून त्यांना काम करावे लागत होतं…तशी त्यांची जी परिस्थिती होती ती बरेचसे बँक कर्मचारी समजू शकतील असं मला वाटतं…माझ्या ताईंचे एक मित्र मानसोपचारतज्ञ आहेत, त्यांनी सांगितले होते की माझ्या वडिलांची जी हालत निवृत्तीच्या तोंडावर झाली होती, ती आज icici, hdfc इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची १० वर्षातच होते………असे कितीतरी लोकं त्यांच्याकडे आधीच consulting साठी येत होते…………त्यापेक्षा माझे काम खूप बरे आहे, इथे निदान browser उघडून post तर लिहिता येते 😉 …असो ….तर त्यावेळी मी आधीच निराश त्यात, दुसऱ्यांना माझ्यामुळे होणारा त्रास बघून अजूनच खचून गेलो होतो मी…ताई सतत बोलवत होती…दादा सांगत होता कि तिला एकदा भेटून घे…आजी आठवण काढत होती, आत्याला मला भेटायचे होते…कधी कधी एकांत मिळवण्यासाठी हे जग सुद्धा किती लहान पडतं ना?…दूर कुठेतरी निघून जायची इच्छा होते अश्या वेळी, नाही का?

असाच एक दिवस मी आजीकडे भेटायला गेलो होतो, तशी माझी आजी म्हणजे जुन्या चित्रपटातली ‘ललिता पवार’ होती… अश्या तिच्या सगळ्या सुना म्हणतात, बर का! 😉 … पण नातवंडांसाठी तितकीच प्रेमळ आहे ती 🙂 . ….सकाळी नाश्ता करायला आजी कडे कुणी नातू गेला, आणि त्याने जरा आजीला म्हटले कि ….”आजी….! पोहे छान नाई झाले आहे …”, तर…. जिने कुणी (तिच्या सुनेने किंवा पोरीने) पोहे केले असतील, तिची खैर नसते…….नातवाला मात्र परत दुसरा नाश्ता मिळतो मस्त! 😉 …

ह्यावेळी मी जेव्हा तिला भेटायला गेलो तर जरा बारीकच झालो होतो, माझी लहाणी आत्या पण आली होती तेव्हा माहेरी, तिच्या पोरी पण तिथेच खेळत होत्या, अन माझी आजी मला पाहून बडबडत होती…ती तिची सवयच आहे, सगळ्यांना रागवायची…तिने रागावले नाही तर तिला भेटल्यासारखे वाटत नाही आम्हाला 🙂 … मी कसल्या तरी काळजीत आहे हे तिने ओळखलंच होतं…म्हणून तिची बडबड सुरु होती… बोलतांना तिला तसं कुणी थांबवू शकत नाही, नातू सोडला तर…पण ह्यावेळी माझे तसेही बोलणे कमी झालेले…मी कसला तिला थांबविणार होतो…पण तेवढ्यात माझी आत्याची छोटी मुलगी, आमची फ्रुटी बोलली…”कोण तेन्षण मध्ये आहे…?…काय झाले?…”…आत्या म्हणते …”अगं हा तुझा दादा नाही का? हा टेंशन मध्ये आहे”…असं म्हणायची वेळ अन ती चिमुरडी लगेच माझ्या मांडीवर येऊन बसली आणि मला विचारायला लागली …”तेन्षण आलं तुला….? ….रडला का तू….? ….रडू नाई…काई नाई होतं….”…आणि लहान पोराला जसा गालावर पापा घेऊन आपण जवळ घेतो तसं माझ्या गालावर पप्पी घेऊन मला जवळ घेऊन बसली 🙂 …क्षणात पूर्ण वातावरण बदलून टाकले तिने…आम्ही सगळेच हसायला लागलो तिथे…लहान मुलं पण कसे असतात ना? कधी कधी असं काही करून जातात किंवा बोलून जातात जे खरे तर कुण्या मोठ्याने करायला पाहिजे असतं…कधी कधी त्यांचाच कडून मोठ्यांना शिकावं लागतं…आपणच सांगितलेली एखादी गोष्टं जेव्हा आपण विसरून जातो तेव्हा हेच लहान मुलं आपल्याला तिची आठवण करून देतात.

कुणाकडे गेल्यावर कसं वागावं…कुणी पाहुण आल्यावर कसं वागावं हे खरतर सगळेच लहाण्यांना सांगत असतात…पण काही गोष्टी ह्या सांगितल्याने नाही तर आपल्या वागणुकीतून हे पठ्ठे शिकत असतात, आत्मसात करत असतात…म्हणतात ना..संस्कार हे कुणी कुणावर करत नसतं, ते होत असतात…आणि मग त्यातूनच एखादी फ्रुटी तयार होत असते…

माझ्या मामाचा मुलगा ७-८ वर्षाचा होतं जेव्हा आमच्या घरी आला होता. आमच्या घरासमोर एक विहीर होती आणि तिला असलेली कडा उंच नव्हती, ह्याचा डोक्या पर्यंत यायची ती. मी त्याला सांगितले होते विहिरीजवळ जायचे नाही, त्यात तोल जाऊन पडू शकतो आपण, आणि काही दिवसानंतर मीच जेव्हा त्या विहिरी जवळ गेलो…तर हा आतून मला हाक मारतो आहे…”दादा विहिरीजवळ नको जाऊ, पडतो त्यात आपण”…मला हसायला आले आणि कौतुक पण वाटले त्याचे 🙂 , एका सांगण्यात ती गोष्टं शिकला होता तो, आणि त्यावेळी जर मी त्या विहिरी पासून दूर नसतो झालो तर तो तेही शिकला असता…आपल्यालाच बघून तर मोठे होत असतात ना ते. खरच ओल्या माती सारखे असतात ही लहाण मुले…जसे घडवाल, तशी घडतात…आस पास होणाऱ्या गोष्टी आत्मसात करत जातात, आपल्याला बघून कधी आपल्या सारखे बनतात समजत सुद्धा नाही…कधी कधी तर आपल्याहूनही पुढे निघून जातात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही…माझ्याच लहाण्या भावाला बघतो तर कित्येकदा विचारात पडतो कि काही वर्षांपूर्वीच तीन चाकी चालवणारा…”दादा दादा” करत माझ्या मागे मागे धावणारा माझा लहाण भाऊ कधी इतका मोठा झाला कि आज गरज पडली तर माझ्या पाठीवर हाथ ठेवून मलाच हिम्मत द्यायला लागला आह,कळलं देखील नाही मला …अशावेळी मी अगदीच निशब्द होऊन जातो…सगळं जग थांबून जातं…माझ्या त्याच लहाण्या भावाकडे मी अभिमानाने बघत असतो…तेव्हा डोळे अलगद पाणावतात…आई वडिलांनी लावलेल्या बागेतलं एक रोपटं, दुसऱ्या लहाण रोपट्याला वाढतांना बघून स्वतः मोहरायला लागतं… 🙂