Monthly Archives: जून 2011

कॉलेज डेज….एक किस्सा

“अरे वैभ्या…लवकर ये माझ्याकडे… आज कार्यक्रम आहे…माझे जुने मित्र पण आले आहेत…”

“ओली कि सुकी बे?”

“सुक्या पार्टी ला तुला बोलवणार का बेवड्या…!!!”

‘”वाह वाह… आलोच…!!” 😛
…………………..
……………..
“ये वैभ्या… वैभ्या हा हा, … तो तो, .. तो तो (तोच रे तिच्यामागे असायचा म्हणालो होतो…तोच :P), … अन तो तो!…. आणि हा… हा माझा सर्वात जवळचा मित्र आहे… आणि वैभ्या आहे… माझ्या कॉलेज मध्ये आहे… असा असा आहे….”
“ये वैभव … अरे आम्ही फार जुने मित्र आहोत.. म्हटला ह्याला भेटायला यावं म्हणून आलो …हा तुला पण बोलावतो म्हणे… चला बसुयात मग …”

“बाल्कनी मध्ये”(हा तुला लायी माज न तुझ्या बाल्कनीचा साल्या… पण चल, बरं असतं मोकळ्या हवेत, वास उडून जातो लवकर ) 😛

“अरे हा नाही येतो आहे का सोबत …?”
“नाही रे … तो पिक्चर बघतो आहे न पीसी वर…(एक तर पिवळी पुस्तके नाहीतर निळे चित्रपट 😉 ) तो नाही बसायचा आपल्यासोबत…”
“अरे पण तो पण तुझाच जुना मित्र ना? … असा एकटाच बसेल का?”
“हो रे .. त्याला बसू दे… तू ये इकडे..(त्याला एकट्याच करायला आवडतं साऱ्या(?) गोष्टी. लग्नानंतर एकटाच जाणार आहे हनिमूनला!)”  😛
…………………..
……………..
“आ हा हा हा… काय टेस्ट आहे .. वाह!!

“तंदुरी कसली जबरदस्त लागत आहे यार.. बियर आणि तंदुरी. सोबतीला ल्यापटॉप
आणि इंटरनेट.बस्स! अजून काय पाहिजे माणसाला!!”

“अबे त्या पार्क समोरच्या बार मधून फ्राईड फिश आणायची ना… काय चव असते तिची!!”

“काही म्हण राव… मस्त माहोल बनला आहे आता तर….”

ए चल संपला पण माझा, दुसरा भर…

“अबे , बॉटम्स अप? झेपेल ना?”

“अरे..छोड यार, अभी तक वो बनी नही जिसे हम पचा नही सकते…..”

दुसराही संपतो आणि मग सुरूवात होते……

“…. बॉस वैभव, तुला सांगतो …जगात कुठलीच अशी गोष्ट नाही जी शक्य नाही आहे… बस! ….बस कॉन्फीडन्स पाहिजे!!”
“बघ माझ्याकडे … तुला वाटतं कि माझी कोणी गर्लफ्रेंड असेल म्हणून…? (मी (स्वगत) :या साल्याला गर्ल्फ्रेंड काय बॉयफ्रेंडपण असणे शक्य नाही, पियू नकोस हलकटा! चढलीय तुला!!)” 😡
प्रत्यक्ष : “त्यात काय आहे… कुणाची पण असू शकते कि… हे हे ” (स्वगत : वाट बघ साल्या, नाकावरची माशी पण उडत नाही तुझ्या?) 😡
“अरे बघ कि थोबडाकडे माझ्या….वाटते का तुला कि असेल माझी म्हणून ….”
“न..नाही.. नाही वाटत…” (वाटायचं काय त्यात. माझी खात्री आहे साल्या! चुतीयातली चुतीया पोरगी पण भिक नाही घालायची तुला…) 😀
“हां!!!………पण माझी आहे बॉस… आणि ह्यांना विचार कशी आहे तर….हम्म…”
“अरे लयच भारी आहे राव…(फुकटे दिसताहेत साले सारे…. बाटल्यांचा खर्च हा हिरो करतो वाटतं.)” 😉
“अरे इतकी सुंदर आहे ना ह्याची वाली… कि बस… मॉडेलच रे!!”
“बघ .. ऐकलं? …शर्यत लावली होती मी ह्यांच्या सोबत… गेलो होतो सहज बोलायला तिच्याशी.. नाही म्हणाली… मग ठरवून टाकलं त्याच दिवशी… बास्स! ….हिला पटवायाचंच!! …आणि आज बघ…”(ह्या सार्यांची पोरींची चॉईस लयी बेकार दिसते… अन जर खरंच असेल, तर त्या पोरीच्या चॉईसबद्दल विचारायलाच नको) 😀 😀

“म्हणून तुला सांगतो जगात एकच गोष्ट महत्वाची आहे …..कॉन्फीडन्स!!!!”
“एकदा तो आला ना… कि सगळं काही शक्य आहे बघ..”(कसला कॉन्फिडन्स भडव्यो, खिशात पैसा आणि Gखाली गाडी पाहीजे)

“बरोबर आहे….(पुंडलिक वरदे हाSSरी विठ्ठल्..श्री पेताडेश्वर महाराज की जय, आई व्हिस्कीबायचा इजय असो!)” 😛 😛
……………………..
………..

“अबे हे वरती कोण लोकं आहेत रे? ….लय दंगा सुरु आहे….”
“काय माहित कोण आहे तर .. .पण
आवाजावरून तर वाटतं चांगले ३०-४० लोकं तरी असावेत…”

(असतील आपल्यासारखेच…, ओवाळून टाकलेले)

“कसला आवाज करताहेत साले.”
“हां ना साला ….आणि हाच दंगा आपण केला असता तर सोसायटी वाले लगेच आले असते दम द्यायला आपल्याला…”
“हो ना… अरे तुला सांगतो यार आमच्या सोसायटीचे मेंबर अशे आहेत ना …”
“अरे काही नाही रे… सगळं सांभाळता येतं… फक्त कॉन्फीडन्स असायला पाहिजे….”

(ह्याच्या कॉन्फीडन्सच्या नानाची टांग रे!!!)
…………………
“खी खी.. खे खे… हे हे …. हा हा हा ”
……………………..
…………………
“अबे … लोचा झाला यार! … मी…. त्या खालच्या माणसाने मला बघितले यार….”
“काही होतं नाही रे… कुणी बघितलं?”
“अबे तो तुमच्या बाल्कनीच्या खाली ज्याची बाल्कनी आहे, त्यानं.”
“काही होतं नाही रे…”
“अबे थुकलो बे मी त्याच्या अंगावर चुकून …”
“क…काय????…. तू काय केलंस??” (कॉन्फीडन्स आहे रे हिरोत… मान गये बॉस!!) 😀
“अबे माझं लक्ष नव्हतं बे!”
“अबे!!! … कुठे आहे तो?”
“तिथे तर नाही आहे… मला बघून गेला तो…” (आता कशाला थांबतोय तो तिथे, थांब….येतोय वर तुझा कॉन्फिडन्स काढायला) 😛 😛
“चायला येऊ शकतो राव …आणि बाल्कनी मधला जुना पसारा बघीतला तर काहीच खैर नाही राव!!!”
ठक ठक ठक ठक!!!!! (हुर्रे…आला..आला ) : D 😀 😀
“बे…आला वाटतं तो!! ….अबे काय करू बे? …दार बंद कर बाल्कनीचा … इथे आला तर वाट आहे राव….”

ठक ठक ठक ठक!!!!!

ठक ठक ठक ठक!!!!!
“अबे दार कशाला बंद करतोस …तू तरी जा तिथे… तिथे तुझा मित्र एकटाच बसला आहे…(ते ही निळा पिक्चर बघत) ” 😛
“अबे नाही वैभ्या मी नाही जाऊ शकत… माझा तर पार राग करतो तो…. (कॉन्फिडन्सच्या आईचा घो…)” 😛
ठक ठक ठक ठक!!!!!
“अबे तुझा मित्र दार पण नाही उघडत आहे का?”
“हेडफोन लावून बसला असेल बे… ” (साला पॉकेट टेबल टेनीस खेळत असेल ) 😉
“अबे मग तू जा कि!”
“नाही बे…” (हॅव कॉन्फिडन्स् मित्रा …कॉन्फिडन्स्…कॉन्फिडन्स ?) 😀
“उघडलं …..उघडलं बहुतेक त्यानं….थांब…”
(“बाकी पोर कुठे आहेत रे??….कुठचा आहेस तू?? ….हां???…..काय तमाशा लावला आहे हा???”)
ताड! … ताड!

(आईच्या गावात!…. हाणला वाटतं साल्याला…) 😀 😀
ठक ठक ठक ठक!!!!!
“अबे मारताहेत त्याला … दार उघड तू!!”
“नाही .. थांब थोड्यावेळ… इथे नको यायला ते….”
“ए तुझा मित्र आहे रे तो … पाहुणा आहे इथे तो…”
(“ए हरामखोर दार उघड! माला मारताहेत हे… उगाच!!!”)
ठक ठक ठक ठक!!!!!
…..दार उघडल्या जातं….
“काय रे… काय तमाशा लावला आहे हा? आ? ….कुठली पोर आहेत हि??”
“पोलीस कम्प्लेंटच करतो थांब….” (साले पिता ते पिता, अन एकेकटे?!!) 😮
“अरे हाना साल्यांना… धिंगाणा घालतात रोज लेकाचे….”
“नाही काका… फक्त आजच…”
“आजच्याच दिवसात इतका पसारा केलास का तुम्ही??? दुकान मांडल्या जाईल ह्या सगळ्यांचं आरामात!!” (शेजारी(स्वगत):आज तुला दावतोच, माझ्या पोरीवर लाईन मारतो काय) 😡
“अरे शांत व्हा…उगा जास्त काही करू नका…”
“हो काकू… अहो चुकलं आमचं…(मी (स्वगत): हं..आता काकु का, मघाशीतर माल होती)” 😛
“अरे काय चुकलं बिकल न्हाय .. .म्या तर म्हणतो हाना साल्यांना…”(मारशील, मारशील माझ्या मालवर लाईन : शेजर्‍याच्या पोरीवर लाईन मारणार दुसरा पंटर) 😡
“पोलिसातच देऊ ह्यांना…”
“काका… अहो…”
“वैभ्या काही बघ बे…” (कसला बोडक्याचा कॉन्फिडन्स, माझी फाटलीय आता) 😦
“अबे तू शांत रहा …मी बघतो..
काकूंना घायला पाहिजे सोबत… पण तुझे मित्र कुठे गेलेत??(दारुचे यार साले)” 😡
“माहित नाही….”
“ए ..खोलीच्या बाहेर काढा सगळ्यांना… आणि मालकाला फोन लावा आत्ताच्या आत्ता…कुलूप लाव खोलीला आणि येऊ दे ह्यांच्या मालकाला….”(साला इथे आमची झोप मोडणारी कारटी ठेवून, स्वतः झोपतो काय! ) 😡
“अहो काका… रात्र झाली आहे.. सकाळी लावा ना त्यांना…”
“ए लाव लवकर फोन आणि बोलावा आत्ताच्या आत्ता…!”(रात्र झालीय म्हणूनच तर लावायचा आहे फोन.) 😛
“निघा तोवर बाहेर सगळे…”
“बे वैभ्या कर बे काही….”
“तू थांब जरा …काकूंना पकड तू… मी अक्षय ला घेऊन येतो….करतो आम्ही काही तरी..”
“वैभ्या कुठल्याच हालतीत पोलीस कम्प्लेंट नको व्हायला बे…”
“तू थांब मी बघतो …. कॉल करतो आहे मी अक्षय ला, थांब…(मी (स्वगत): झाली तेवढी अद्दल खुप झाली, कायतरी चावी लावायला पायजेल, नायतर आपल्यावरपण बेतायचं. चांदणेला समजलं तर खरंच हाकलायचा मला तो फ्ल्याट वरून) (मी त्याच सोसायटीत दुसर्या फ्ल्याट मध्ये राहतो…माझ्या रूम वरचे पंटर साले वरून बघताहेत तमाशा, पण खाली यायचे नाहीत मदतीला साले! 😛 )
……………………..
…………………
“अहो काकू आम्ही शिकणारी पोरं … चुकतं आमच्याकडून पण कधी कधी… जाऊ द्या ना… झालं
ते पुरे आता … नाही होणार असं काही… तुम्ही सांगा न काकांना…”(मारला बुवा ब्रह्मास्त्र एकदाचं… वाचूयात बहुतेक आता) 🙂
“आणि अहो काकू ह्यांच्या पेक्षा तर जास्त दंगा ती वरची मानसं घालताहेत….पण तिथे तुम्ही काहीच बोलत नाही आहात… हे असं नाही का कि हि पोरं काही करू शकत नाही म्हणून तुम्ही सगळे अशी करता आहात…”(ह्याच्या ….मायला  नाही तिथे बोटं घालायची सवय गेली नाही साल्या तुझी!) 😡
“हे बघ… माझ्या नवऱ्याच्या रागाला पार नाही आज.. मी बघते तरी… अहो!!… ती वरची पण माणसा बघा ना…”
“त्यांना पण बघतो थांब …सोसायटीचा मजाक बनवून ठेवला आहे सगळ्यांनी…. पोलीस तर बोलावातोच आज…”
“च्या मारी… अक्ष्या! …काही खरं नाही रे बाप्पू आज तर…”
“अबे बघा बे काही .. तू थांब इथेच… हे चालले आहेत वरती सगळे… मी आणि अक्षय जातो सोबत काकूंना पकडून करतो ठीक ठाक…”

“बघा बे….”
“ए अक्ष्या वर चाललेत हे… पण प्रकरण निव्वळ वाढणारच आहे… त्याच्या आधी काही तरी करायला पाहिजे…”
“चाल बघू काय होतं ते…”
……………………..
…………………
“तू तर गेला बॉस!!…काही खरं नाही आता… पोलीस तर येतेच आता..” ( 😀 😀 )
“क् …का बे? ….काय झालं? … अबे ते काकांचं पोरगं…. हे हे हे.. ”
“हसतोय का बे … सांग ना काय झालं ते….”
“अबे त्या काकांच्या पोरालाच मारताहेत ते वरचे…”
“पण वैभ्या त्या काकुत लायी जोर आहे बे…”
“हा ना बे.. कसलं गेंड आहे ते पोर.. आणि एका हाताने दाबून धरलं होतं त्याला भिंतीत काकूने….”

का बे ? झालं तरी काय…?…सांगा बे…”
“अबे तुझ्या मित्राला हाणला ना.. त्यामुळे जोशात होतं ते काका… तिकडे पण मारतोच म्हणे… … तरी गेला ते शेवटी… दार वाजवायला त्या वरच्यांच..”
“मग??”
“मग काय! …..दर उघडून फक्त पोराला आत घेऊन… बंद केला त्याने…. मारताहेत त्याला चांगलेच….” (येडेच हाय्त, काकुला आत घ्यायचं सोडून तिच्या पोराला काय आत घेतलय) 😛
“आणि हे काय करत आहेत मग बाकीचे…???”
“ते बघायला आम्ही कुठे थांबलो तिथे!!!….त्याला आत जसाच ओढून दार बंद केलं…तसाच आम्हाला समजलं…आता गोष्ट गेलीय हात बाहेर… आम्ही आलो पळत खाली…”
“आता बे… ???”(बोटं करायला सांगितला कुणी होतं साल्या तुला … नको तिथे बोटं घालू नये, अन घातलंच तर वास घेऊ नये. ) 😛
“आता बघ… ती वरची मानसं जास्त आहे संख्येने… ह्या सोसायटी वाल्यांना नाही आवरायची ती….पोलीस आलीच तर त्यांनाच टार्गेट करेल .. तुम्हाला नाही…”
“तुझ्या मालकाशी बोलणं झालं का?”
“अरे तो फोन उचलत नाही आहे ना…”
“ठीक आहे ”
“माफी माग… काही होतं नाही…. तोवर आहोत आम्ही इथे…”
“पण साल्या तुझे मित्र कुठे गेलेत बे??
….मला वाटला खाली थांबले असतील…”
“काय माहित यार….”
“बघ काही नाही होतं…”
(मी (स्वगत): वैभ्या, पळ लेका…करायला गेलो एक आन झालं भलतंच) 😀

……………………..
………………………………………..
…………………

(माझ्या फ्ल्याट वर)
“काय झालं होतं बे?? …आम्ही वरून पाहत होतो शो मस्त !!”
“अबे जाऊ दे…. झोप आता…”
“अबे सांग ना वैभ्या… काय झालं ते…”
“नंतर सांगतो रे …”
“अबे सांग ना आत्ताच… मजा येत होती वरतून बघून…”
“हे हे हे .. मला पण… काय झालं….मला फोन आला ह्याचा… ह्याचे मित्र आले होते भेटायला ह्याला …….”

(प्या लेको, कॉन्फिडन्सने प्या……..) 😛 😛

– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
कॉलेजच्या दिवसांची अशीच आठवण येत होती तर तेव्हा झालेला असल्याच एका किस्स्याला थोडं रंगवून लिहिलंय…  सुरुवातीला जसाच्या तसाच लिहिला होता, पण विशाल ने थोडे संदर्भ जोडायला सांगितले… त्याच्या सारख्या लिखाणाची पातळी गाठणं सध्या तरी अशक्यच वाटते, पण त्याच्याकडून मार्गदर्शन मिळत राहिलं तर ते सुद्धा होऊनच जाईल. मेट्या! मनावर नको घेउस राज्या! 😉