म्यानेजमेंट – ह्यांना त्रास काय असतो हो??

“वैभव!”

( “काय आहे बे आता?”)

हा मला हाक मारतोय ना, हा आहे माझा म्यानेजर. मी एफ.बी. वर लॉगीन व्हायचं आणि ह्याने, लेकाने, माझ्या सिस्टीम जवळ यायचं, ह्यात ह्याचं टायमिंग गेल्या दीड वर्षात कधीच चुकलं नाही! … पण करता काय? असो ….

“यस सर … ?”

“अरे वैभव, तुझं रेसिग्नेशनचं तर अपेक्षित नव्हतंच …. त्यात तू नोटीस पिरीयड सुद्धा सर्व्ह करायला तयार नाहीयेस …. का रे बाबा?”

(“तू पिळला तेव्हढा पुरे नाही का रे? … आता तरी जाऊ दे कि मायला!”)
“सर मला दुसरा जॉब मिळालाय … आणि त्यांना जॉयनिंग लवकर हवी आहे …आणि माझी प्रोजेक्ट तसाही संपलाच आहे. तर वाटलं कि तुम्हाला काही प्रोब्लेम नसेल … ”
(“नसता मिळाला तरी हेच म्हटलं असतं हलकटपूर नरेश! … तुमच्या राज्यात अजून राहिलो तर माझी असली नसली बुद्धी सुद्धा खपवणार तू!”)

“अरे हो रे. …. पण… म्हणजे. …”

हा असाच बोलतो …. ह्याच्या वाक्यातल्या शब्दांचं काहीच ताळ-तंत्र नसतं. वरून आपल्यालाच विचारणार, ‘Are we on the same page? … You got me right??’ …. सवय झालीये आता आम्हाला,असो ….

“अरे हो रे. …. पण… म्हणजे. …तसा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. …. म्हणजे … मला काय? …. मी तर …. मला तर खरं तर आनंद होतो आहे …. म्हणजे? …. मी … मला … नाही … हां …. तू समजला ना ?? …. तू सांग बिनधास्त … कधी जायचय ते …… मी सगळं सांभाळू शकतो!”

(“अरे! अरे! जिभेला सांभाळायला शिक कि आधी! बोलतोय काय … डोक्यात काय??? …. आणि मधेच बाजूने जाणाऱ्या ह्या राजलक्ष्मीला बघतोस काय? …. डोकं … (जर असेल तर), व जीभ आणि डोळे इकडे तिकडे पळवण्यापेक्षा एका गोष्टीवर लक्ष देशील तर आमची धावपळ कमी होईल रे …. नॉन-सेन्स!!”)
“सर मग के.टी. करून एक दहा दिवसात रिलीव्ह करा मला.”

“दहा दिवस!!! …. नाही! …. म्हणजे …. काम नसेल तर एकही दिवस रिकामा कंपनी मध्ये घालवायचा नाही ह्या मताचा आहे मी … आं? …. हा! …कसं आहे, काम नसेल ना, तर दुसऱ्या आठवड्यात पेपर टाकायलाच पाहिजे …. रिकामं बसून वेळ वाया घालवायचाच नाही. अरे मी सुद्धा तेच करेल .. मी सांगितलंय न तुला आधीच. ….हो ना?”

(“त्या हिशोबाने तर …., जॉईन केलास त्याच्या पुढच्याच आठवड्यात तू रिझाईन करायला पाहिजे होतं हलकटा!! जॉयनिंग फॉरम्यालिटीस सोडल्या, तर कामंच काय केलेस तू?”)
“हो सर. सांगितलंय तुम्ही. तर मग …. दहा दिवस पक्के समजू, मी सर??”

“हो..,हो!!! … म्हणजे …. बघ … माझ्या कडून काहीच प्रॉब्लेम नाहीये रे .. बाकी म्यानेजमेंट च्या हाती… ह्यांचा लेकांचा काही नेम नसतो रे …. मी सांगितलंय त्यांना! …. कि त्याचं मन नाहीये इथे … जाउद्या त्याला …. पण …. म्हणजे? …. मी … मला … नाही … हां …. तू समजला ना ??”

(“हां … बिलकुल समजलो सारं … म्हणजे तू काही मदत करणार नाहीयेस माणसा…”)
“बरोबर सर!”

“बाकी बरे केलेस तू वैभव, तशीही हि कंपनी तुझ्यासाठी बरोबर नाहीये … काय माहित काय सुरु आहे! … मी पण रिजाईन केले आहे. माहित आहे ना तुला?”

(“हां तो तुझ्या ड्राफ्ट मध्ये असलेला मेल बद्दल बोलतोय होए?? … तीन महिन्यांपासून किती लोकांना दाखवलास तू? ….. अरे किती लोकं तर खरंच आस लावून बसले आहेत कि तू निघशील इथून!!! … लोकांच्या भावनांसोबत असं खेळ करतो हलकटा? लवकरच वरच्याची लाथ बसणार आहे बघ तुला!!! “)

“कधी? केले सर? तुम्ही रिजाईन??”

“शुक्रवारी रे.”

(“शुक्रवारी होये!! …. अरे शुक्रवारी शेवटचे २ तास तुझाच मेल बॉक्स उघडून मीच विचार करत होतो तुझं रेसिग्नेशन सेंड करायचं म्हणून, तू काय थापा मारतो आहे मला!! … तुझा पासवर्ड माहित्ये मला. अॅडमिन ने दिलेला पासवर्ड सुद्धा बदलण्याची बुद्धी नाहीये तुला …. किती कष्ट लागलेत माहिती आहे सेंड वर क्लिक ‘न’ करण्यासाठी???!!! ….. पण तू काही सुधारायचा नाहीस … सेंड करूनच टाकतो थांब आज … अरे त्या डी.एम. चा पासवर्ड माहित नाही म्हणून सांग, नाहीतर तिकडून एक्सेप्ट सुद्धा केलं असतं मी तुझं रेसिग्नेशन!”)
“ठीक आहे सर. ऑल द बेस्ट!”

– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –

“वैभव”

(“आलास परत!”)

“डी.एम. बोलवतोय तुला…”

(“सोडताहेत कि काय? …. चांगली बातमी दे रे देवा!! “)
“आलोच सर.”

– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
“सर, मला बोलावले होते तुम्ही?”
(हा एच.आर. म्यानेजर काय करतोय इथे?? ….चांगली बातमी ….. चांगली बातमी ….. रिलीव्ह …. रिलीव्ह ….)

“हो वैभव.”

” ….वैभव तू २२ इंटरव्ह्यूस घेतलेत … पण एकही क्यांडीडेट् सिलेक्ट नाही केलास … ”

(हान तिच्या मायला …. मला वाटला सोडताहेत मला … )
“सर, प्रोफ़ाईल तितक्या चांगल्या नव्हत्या ….”

“का बरं चांगल्या नव्हत्या??”

(म्हणजे??? …. अरे चांगल्या नव्हत्या, म्हणजे, चांगल्या नव्हत्या!! … अजून काय आहे त्यात …. सायफर सायफर खेळतो आहे का आपण इथे!!!)
“म्हणजे सर? मी समजलो नाही.”

“म्हणेज वैभव, तुला २२ प्रोफाईल्स दिल्या होत्या आतावर …. अजून नाही आहेत प्रोफाईल …. काय करायचे सांग?”

(“नाच मग! … मी काय करू त्यात??”)
“सर मी काय करू शकतो … इथे जे काम करावं लागतं त्या हिशोबाने मला क्यांडीडेट्स ठीक नाही वाटले … काही क्यांडीडेट्सला तर सर साधी रिक्वायरमेंट सुद्धा कळत नाही सर…”

“एक मिनिट, रिक्वायरमेंट इंग्लिश मध्ये असते बरोबर? …. तू म्हणतो आहेस कि क्यांडीडेट्स ला इंग्लिश सुद्धा येत नाही?”

(“तुम्हाला तर नक्कीच येत नाही असं दिसतंय सर!!!! … अरे काय लावलं आहे हे?”)
समोरच्याच्या कानशिलावर वाजवायला उचलेला हाथ कसाबसा कपाळावर फिरवतो आहे असे दाखवत त्रासून मी समोर बघत होतो …

“तुला अजून दहा प्रोफ़ाईल्स देतो वैभव… ह्यातून कुणी तरी सिलेक्ट होईल ह्याची हमी देतोस का तू?” – इति ह्युमन-रिसोर्स-डीपार्टमेंट नरेश एच.आर. म्यानेजर.

(“तुझ्या डीपार्टमेंट मधल्या ज्या पोरीला तू लग्नाचं आश्वासन देऊन २ वर्षापासून फिरवतो आहेस, ती एक दिवस तुझ्या घरी जाऊन तुझ्या बायको पोरांसमोर तोंड उघडणार नाही ह्याची हमी देऊ शकतो का रे तू??? मला हमी मागतो आहे!”)
“सर मी हमी नाही घेऊ शकत ह्याची, प्रोफाईल ठीक वाटली तर ठीक, नाही तर नाही … आणि तसंही रिसोर्स म्यानेजमेंट माझं काम नाही. तुम्हाला सिलेक्ट करायचंच असले कुणाला तर करून टाका तुमच्याकडूनच. नंतर मला बोलणे नाही ऐकायचे कि ‘हे तू कुणाला सिलेक्ट केलंय?’ म्हणून.”

. . . . . . .
. . . . .
एच.आर. म्यानेजर आणि डी.एम. एक दुसऱ्याकडे बघताहेत ….
. . . .
. . . . .

“तुम्ही जाऊ शकता वैभव.”

– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –

म्यानेजमेंट! ….. कुणीही जॉब बदलण्याचं ८०% कारण!! ….नाही नाही. मी दुसरीकडे जॉईन करतांना एच.आर. ला आपण सांगतो त्या कारणाबद्दल बोलत नाहीये. मी, आपण दुसरा जॉब शोधणं सुरूं करायच्या खऱ्या-खुऱ्या नेमक्या कारणाबद्दल बोलतोय. काय म्हणता? तुम्ही नाही आहात सहमत? तुम्ही संतुष्ट आहात तुमच्या जागी?? हम्म …. भाग्यवान आहात मग तुम्ही … पण मी तर असं ऐकलं आहे कि ‘कर्मचारी कधीच म्यानेजमेंट कडून संतुष्ट राहू शकत नाही!’. निदान इथे तरी मानतात असं. आणि त्यामुळेच कदाचित म्यानेजमेंट कर्मचाऱ्याच्या असंतुष्टी ला खूप काही किंमत देत नाही.

बरं चला …… हे जरी मानलं कि ‘कर्मचारी कधीच म्यानेजमेंट कडून संतुष्ट राहू शकत नाही’, पण मला सांगा, म्यानेजमेंट तरी कर्मचाऱ्याकडून कधी संतुष्ट असतं का? मला तर नाही दिसत कुठेच, कधीच! ……. काही ना काही, …..कुठे ना कुठे, …… कुणी तरी असंतुष्टच असतो (कर्मचाऱ्याकडून)….

उदा.

तुम्ही आपला काम संपवून लवकर घरी जातो म्हटलं तर, . . . .

“नाही, शक्य नाही. पूर्ण ८ तास बसवाच लागेल. पॉलिसी आहे.”
. . . . .

“असं कसं काम नाही तुझ्याकडे? मी देतो थांब!” (आणि आलाच मग दोन पानांचा मेल तुमच्या मेल बॉक्समध्ये!!)
. . . . .

“आजचं झालं तर त्यात काय? उद्याचं कर.” (कधी कधी तर शेजारी पण येऊन बसतात हे लोकं, पण सोडणार नाही तुम्हाला!!!!)
. . . . .

बरं मग तुम्ही सकाळी ९:३० च्या ऐवजी १०:३० ला (एक तास उशिरा) येऊन ८ तास मात्र पूर्ण करून जरी जात असला, तर, . . . . .
“तू वेळेवर येत नाहीस … कम्प्लेंट आली आहे तुझ्या नावाची.” ( कुणी करत नसतं हं ह्या कम्प्लेंटस! हेच करत असतात….!)
. . . . .

त्यात तुम्ही पुरुष असाल तर, . . . . .
“एखाद्या बाईने म्हटलं असतं तर ठीक आहे, तुला कुठे सकाळी उठून डब्बा तयार करावा लागतो. (काम करायला बायको/आई असेलच.) प्लीस वेळेवर येत चल.”
. . . . .

आणि जर तुम्ही स्त्री असाल तर, . . . . .
“एखाद्या, अविवाहित पोराने असं म्हटलं असतं तर ठीक आहे, त्या वयात सवयी नसतात कि लवकर झोपेल माणूस. पण तुमच्या बाबतीत तर हे शक्य नाही. तेव्हा तुम्ही तर लवकर यायलाच पाहिजे.”
. . . . .

बर मग तुम्ही वेळेवर येऊन वेळेवर जायची गोष्ट केली तर, . . . .
“बघ तू असं सहकार्य नाही करशील तर कसं होईल? …. ज्या दिवशीचं काम त्या दिवशी संपायलाच पाहिजे.”

मग ती ८ तासांची पॉलिसी काय लोणचं घालायला ठेवली आहे काय?? …. माहित नाही.

. . . . .

२ महिन्यांचं काम एका महिन्यात करायला लावायचं, …. झालं नाही तर, . . . .
“काम तर तसा २०च दिवसांचं होतं, मला नाही कळत ह्याला हितके दिवस का लागताहेत!!!”

म्हणजे खापर हे तुमच्याच डोक्यावर फुटेल!! …. तो मात्र सुटला …

. . . . .

रिसोर्स पुल्लिंग मध्ये एकमेकांच्या रिसोर्सेस ची लावायची आणि रिसोर्स कॉमन असेल तर?? …… मग तर विचारायलाच नको!!!
. . . . .

मुलगी दिसायला चांगली असेल तर तिला आपल्या टीम मध्ये घ्यायचं, कारण काय? तर, . . . .
“नाही, ती कामात फार फार चांगली आहे रे … ”
. . . . आणि तीन दिवसात तिने ह्यांना जर काहीच भाव नाही दिला तर, . . . .

“मला कळत नाही हिला सिनियर कुणी बनवलं तर ….!”
. . . .

“तुला सांगतो ना, मुली नकोच टीम मध्ये, ह्यांच्याकडे ना काम ‘न’ करण्याचे बहाणेच जास्त असतात!”
. . . . .
. . . . .

अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, म्यानेजमेंट कर्मचारी वर्गाकडून खुश नसण्याचे ….

ह्यांना त्रास काय असतो हो?? …. बरे खालचे तिथे गेले कि तेही तसेच बनतात हेही सत्य आहे. बघितलंय मी माणसं बदलतांना. जागेतच काही असावं बहुतेक.कि तिथे माणूस एकदा गेला, कि आपसूकच त्यात हे कौशल्य येत असावं.नाही तर काय सांगावं? किंवा असंही असेल कि प्रत्येकातच हि छुपी प्रतिभा असावी. आणि ती जागा, निमित्त मात्र असावी. काय वाटत?

बरं असंही नाही कि सगळे असेच असतात … काही असतातही चांगले, स्वच्छ!! …. पण मग तसे हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात, असले तरी ते हि बिचारे प्रतिकूल वातावरणात जास्त काही करू शकत नाही. मग एक तर कंटाळून सोडून देतात, नाही तर चीड चीड करत एकटेच लढत राहतात.

काहीही असो, मला तर इतकं समजलं आहे, कि माणसं सगळीकडे सारखेच!! ….. त्यामुळे उगा जास्त जागा बदलण्याचा भानगडीत पडण्यात काही अर्थ नाही. पैसा देखो, और खुश रहो. नाही का?
म्हणून मी तरी आहे त्याच जागी राहणार आहे आणि वेळ घालवणार आहे. …..आणि तरीही …..फारच कंटाळा आलाच तर, . . . .
. . . . . .
आहेच एक मेल, एकाच्या ड्राफ्ट मधला, … उघडून सेंड करायचा आहे बस्स!!!!!!   😉  😀

Advertisements

Posted on एप्रिल 5, 2012, in मराठी, हलकं-फुलकं, managers. Bookmark the permalink. 12 प्रतिक्रिया .

 1. हा हा हा … सही !!

  मला वाटलं माझीच गोष्ट वाचतोय की काय 😉

  • हे हे 😀
   अरे हो ना .. कधी कधी वैताग येतो राव! … मग काही तरी खरडून मनाला शांत करायचं. आणि ‘मीमराठी’ आहेच एक हक्काची जागा त्यासाठी! 😉

   आभार रे प्रतिक्रियेसाठी! जोवर तू, राजे, विशाल दा सारखी आवर्जून प्रतिक्रिया देणारी (लेख भलेही कसाही का असेना 😉 ) मानसं आहेत तोवर आमच्या सारख्या नवशिक्यांना प्रोत्साहन मिळतंच राहणार बघ लिहिण्याचं! 🙂

 2. Ultimate Vaibhya………u r writing like a professional writer…..
  u wrote what is there in everyone’s mind 🙂

  • एक असा व्यक्ती ज्याला 1) विकास जीवन चक्राच्या निरनिराळ्या पद्धती , 2) प्रधान मंत्रीच्या संचालनाच्या पद्धती, 3) परिदान पद्धती, 4) ग्राहक प्रबंधन, 5) विक्रेता प्रबंधन, 6) संबंध प्रबंधन, 7) लोक प्रबंधन, 8) प्रौद्योगिकी अनुभव, 9) उभरत्या प्रोद्योगिक कलेचे ज्ञान अर्थात 1) Life Cycle Development Methodologies, 2) Project Management Methodologies, 3) Delivery Methodologies, 4) Client Management, 5) Vendor Management , 6) Relationship Management, 7) People Management, 8) Technology Experience, 9) Knowledge of Upcoming Technologies आणि अनुभव आहे आणि ज्याची रणनीती (कंपनीच्या नफ्यात वाढ करणारी) ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जबाबदार आहे तो डी.एम. अर्थात डिलिवरी म्यानेजर!

   हुश्य ….. कसली किचकट व्याख्या आहे ना!!!

   माफ करा थोडा खट्याळ मूड मध्ये होतो विजय राव. ब्लॉगवर स्वागत. पोस्ट कशी वाटली तेही कळवा. 🙂

 3. लेख आवडला, डी. एम. च्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: