Monthly Archives: मे 2011

‘प्यार का पंचनामा’ – मराठी

पहिला मित्र -“ती आली होती सकाळी.”
………………….
दुसरा मित्र -“काय बोलली ती?”

पहिला मित्र -……”हेच तू कि तू बोलत नाही आहेस म्हणून…..काय?…काय प्रोब्लेम काय आहे? ”

दुसरा मित्र -“प्रोब्लेम?? ……………अबे प्रोब्लेम हा आहे कि ती पोरगी आहेअजून काय प्रोब्लेम आहे बे??

“प्रोब्लेम हा आहे कि मला वाटतं माझ्या आयुष्यात कुठलाच प्रोब्लेम नसायला पाहिजे ….आणि….. माझ्या आयुष्यात काही प्रोब्लेम नसेल तर हा तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रोब्लेम आहे”
“आणि……. खड्यात तिला काळजी आहे रे…!”

“तिने तर आनंद साजरा करायला पाहिजे …कारण हेच तर तिला पाहिजे आहे ………अरे तुला सांगतो आज काल तर मनात येतं कि तिने तोंड उघडलं कि तिच्या तोंडातच काही तरी टाकून द्यावं!! …मागच्या सहा महिन्यात सगळं बघितलं आहे मी…अबे कोणतं प्रेम? ………कोणतं नात??कसलं सुख?? … रिलेशन चा अर्थच हा असतो कि end to ur own happiness !!…त्याच्या नंतर, all u have to worry abt is, ……तिच्या आवडी! …….तिचा वाढदिवस! ….तिच्या कुत्र्याचा वाढदिवस!!  … तिचा new year जो कधी तुमचाही new year असायचा!”

“………ह्या पोरींना ना….. कुणीच खुश नाही ठेवू शकत……..सुखी बाई हि दंत कथा आहे बे a happy woman is a myth !!!… तू batman वालीलाच बघून घे! ….

‘तू स्वतः तर काही करू शकत नाहीस… काहीच कामाचा नाहीयेस…. good for nothin आहेस मी तुझ्या सारख्या माणसासोबत कशी राहू शकते?!!’….

आणि ज्या दिवशी तो बिचारा batman बनला … मग लगेच …

‘अरे तू तर batman बनलास… मला तर एक साधा नॉर्मल माणूस पाहिजे होता, मी तुझ्या सोबत कशी राहू शकते?!!’ …”

“… सगळा साला ह्या कथेंचा दोष आहे … होपलेस बॉलीवूड रोम्यांटिक मसाला !.. एक पोरगा एक पोरगी दोघं प्रेमात पडले, दोघं एकत्र झाले! फिल्म संपली!! .. पण साला ह्याच्या नंतरची कहाणी कुणीच सांगत नाही ……ह्याच्या नंतरची कहाणी मी सांगतो!…………….ह्याच्या नंतर पोराने पोरीला दोन दिवस मिठी नाही मारली तर प्रोब्लेम .. मिठी मारली तर ‘चीप होत आहे ……इतकं पण चांगला नाही वाटत’ … ………..
……..अबे शोप्पिंग संपत नाही ह्यांची!! … बघ पहिले कुशन्स आले, मग करटंस आले … मग करटंसला म्याच नाही झाले म्हणून अजून कुशन्स आले!! …… साला इतकी कप आहेत माझ्या घरी कि विकायला काढलीत न तर महिन्याचा खर्च निघेल माझा!!!”

“………… एक तर जी गोष्ट विकत घ्यायला जाईल ती घेणार नाहीत … दोन आठवडे डोकं खाईल

‘टेबल घ्यायचा आहे. टेबल घ्यायचा आहे’

… मग ५ तास मॉल मध्ये घालवून एक सडकी चप्पल घेऊन येईल आणि मग परत दोन आठवडे डोकं खाईल…

‘टेबल घ्यायचा आहे. टेबल घ्यायचा आहे’

“. … ऑफिस मध्ये काम करत आहे .. फोन येऊन जाईल! .. फोन उचल्या उचलल्याच सांगून टाकत असतो कि बोलू नाही शकत .. आता एव्हढी का कठीण गोष्ट आहे हि गोष्ट समजायला?? …

‘दोन मिनिट बोलशील तर काय होऊन जाईल….’

….. अरे दोन मिनिट बोलून घेईल तर तुला काय भेटून जाईल माझी आई? धडाने तर बोलू शकणार नाही .. अन त्याच्या नंतर i love u बोलल्याशिवाय फोन काटला … तर नाटक!    …….. सर्वात जास्त दिमागचा दही तर ह्या मोबिल फोन ने केला आहे ! सर्वात फालतू इंवेन्षण आहे साला! …एक conspiracy चा पट्टा आहे गळ्यातला साला… वरून ह्यांच्या जाहिराती पण पहा ….‘घ्या सर एक पैसा पर सेकंद! …अजून फोन करा …जास्त वेळ बोला 🙂 ‘ .. अरे कॉल स्वस्त झाल्याने गोष्टी थोडी मोठ्या होऊन जातात बोलण्यासाठी ! …..मग ह्याचं उत्तर त्यांना पण द्या … ‘कि तुझ्याकडे काहीच कसं नाही बोलायला?.. तुला आता इन्टरेस्ट नाही राहिला माझ्यात’ .. ‘तुला हम्म हम्म च म्हणता येत तर मी तुला कॉलच कशाला केला ?’ …अरे माझी आई…..! ...मला काय माहित तू मला फोन कशाला केला! …..जाऊन भारती मित्तल ला विचार ना !!!!…तुला मी सांगतो त्या जाहिराती मध्ये न तो कुत्रा नाही कुत्री आहे!… शपत्थ!! …..seriosuly शर्यत लावू शकतो मी … ‘wherever you go we follow !!’… ”

“तुला काय वाटतं? ….कोलंबसला माहित नव्हतं कि तो भारतात नाही तर दुसरीकडे चालला आहे म्हणून? … नाही…!…. कोलंबस ला माहित होतं! … तो तर बिचारा बायको पासून दूर चालला होता .. नाहीतर दहा प्रश्न विचारत बसली असती .. ‘कुठे चालला आहेस ? कशाला चालला आहेस ? अच्छा!! ….तुला माहित पण नाही कुठे चालला आहेस? ….सरळ सरळ का नाही सांगत माझ्या पासून दूर चालला आहेस म्हणून!!’ …. अजूनही बिचाऱ्याचा मजाक उडवत सारं जग.!!”

…………………..

……………….

” …ऑफिस मध्ये काम करत असतो .. एस एम एस येऊन जाईल! … ‘I LOVE YOU!’ ….ठीक आहे…. मी पण एस एम एस करून देत असतो ‘I LOVE YOU TOO!! 🙂 ‘ .. मग ह्याच्या नंतर, एस एम एस वर एस एम एस सुरु … अबे काम काय करते बे ऑफिस मध्ये!! …………… दोन एस एम एस चा रिप्लाय नको करू तर लगेच फोन येऊन जाईल …. फोन नको उचलू ….. तर दहा मिनिटात म्यासेज येऊन जाईल ‘i dont think its working nemore’…. दहा मिनिटात i luv u पासून I dont think its working nemore! … and dis is when u r not even down … आता समजलं कि ह्या माणसांना इतके हृदय विकाराचे झटके का बरं येतात आणि ते गे माणसं कसे काय यशस्वी असतात …!!…..कारण त्यांच्या आयुष्यात बाई नसते ना त्यांचं सुख हेरायला!! ”

” .. लोकं म्हणतात ना कि behind every successfull man dere is a woman .. अगदी खरं!! …..पण लोक हे का नाही सांगत कि behind every unsucessman also dere is always a woman!!! ….आणि हे तर कुणीही सांगू शकता न कि अयशस्वी माणसांची संख्या कित्येत पटीने जास्त आहे यशस्वी माणसांपेक्षा ह्या जगात!! ..”

” साला ऑफिस मध्ये काम करत आहे .. सांगतोय कि उशीर होऊन जाईल बाई जेवण करून घे …तर जेवण नाही करणार .. उपाशी पोटी झोपून जाईल …. अरे मी सांगत आहे जेवून घे तरी त्रासाच!!!!! .. काय करू?? नोकरी सोडून देऊ मी???? …साला पहिले घरी जा……ह्यांना मनवा … ह्यांना खाऊ घाला ……ह्याच्या नंतर स्वतःची भूक तर तशीच मारून जाते …पण …हे सगळं होऊनही माणूस जर एखाद्या कोपऱ्यात जाऊन शांतीने बसला असेल ना तर…. ‘काहो? …काय विचार करत आहात ? काय विचार करत आहात ? काय विचार करत आहात???’अरे काही विचार नाही करत माझी माय हा विचार करत आहे कि तुझं तोंड कसं बंद करू !!!… काय विचार करत आहात!… क्यामेरा लावून देऊ डोक्यात माझ्या!!.. ह्याच्या नंतर ….‘आपल्याला बोलायला पाहिजे we need to talk.. i dont think its working nemore’ …”

“….मी तुला सांगतो आहे कि तू कधीच बायकांसोबत चर्चा करू शकत नाहीस ….कारण ह्यांच्या सोबत केलेली कुठलीही चर्चा ती चर्चा नसून वाद असतो! … आणि वादात तर बाबू तू ह्यांच्यासोबत जिंकूच नाही शकत!!… कारण आपल्यासारख्या माणसांची एक बेसिक गरज असते …..we need a sensible argument. आणि sense सारख्या फालतू गोष्टीसाठी त्या वाद हरून जातील??? छ्या!!! .. एक तर आजच्या गोष्टीवर वाद होणारच नाही … आजच्या गोष्टीवर भांडण होईल दोन महिन्या नंतर … तेव्हा आठवत पण नसतं साला झालं तरी काय होतं !! …. पण पोरी त्याला वाचवून ठेवतात .. .‘हे लहान शस्त्र नाही .. मोठ्ठा शस्त्र आहे .. ह्याला मोठ्ठ्या लढाईमध्ये वापरा‘ …… तू कधी try करून बघ, स्वतःला बरोबर prove करून ….. तुला वाटतच असेल कि ह्या मुद्द्य्वरून तू स्वताला बरोबर साबित करशील ……पण तेव्हाच एक आवाज येईल … ‘बोट दाखवू नकोस… खाली कर ते!!’… तुझं लक्ष पण नसेल पण तुझं एक भाबडं बोट त्यांच्या कडे point करत असेल … and suddenly the whole argument will flush into the gutter आणि मुद्दा हा राहील कि ‘तू बोट दाखवलाच कसं मला?’ .. कुणी? कुणी सांगितलं होता तुला?….. साला ह्याच वादात, त्या तुला जोडा फेकून मारतात ते काहीच नाही!! ….पण तू बोट दाखवलं तर सगळे मुद्दे खलास! …….तू चूक ती बरोबर!! ..”.

“लग्नाच्या आधी तो नागीण बिन का वाजवतात? .. हा का वाजवतात? अबे तो ब्यांड वाला पण चेतावणी देत असतो कि साल्या कोण येत आहे तुझ्या आयुष्यात! … अबे ह्यांची signature tune आहे ती !!….”

………………….
…………………….
“…………आता मला सांग ती काय सांगायला आली होती तुझ्या कडे?? ……… आणि हीच गोष्ट मी केली तर? …..हिच्या एखाद्या मैत्रिणीला कॉल करून माझे प्रोब्लेम्स सांगितले तर? .. ‘अच्छा!! माझ्या मैत्रिणीशी बोलायचं आहे!.. तिची सहानभूती पाहिजे तुला!… मग जाऊन राहत का नाहीस तिच्या बरोबर!!‘….. ”

………..

… होपलेस आहे यार…!!! ”

………………………….

…………………….

पहिला मित्र -……”अबे….. हा तुझा जो प्रोब्लेम आहे ना….. तो मला पण आहे यार… !”

दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात.

मी रविवारी ऑफिस ला गेलो तेव्हा…

रविवार…. 🙂 सुटीचा दिवस!… 🙂

…पण तुम्हाला ऑफिसला यावं लागतं… आदली रात्र स्याटर्डे नाईट असल्यामुळे तुमचे रात्री मस्त जागरण झालेलं असतं… रूम वर जमलेल्या एक रूमी, त्याचे २ मित्र आणि शेजारच्या रूम मधल्या अजून एक मुलासोबत गप्पा मारता मारता तुम्ही कधी झोपले तुम्हाला पण आठवत नसतं… पण ३-४ पर्यंत तर जागेच होतो आपण एव्हढं नक्कीच आठवतं… तरी तुम्हाला टी.एल. ने आधीच सांगितलेलं असतं की तुम्हाला उद्या कामाला यायचं आहे म्हणून…सकाळी ९:३० ला येऊन, पटपट कामं आटपून दुपारपर्यंत मोकळा होऊन जाण्याचा फुकट सल्ला सुद्धा मिळालेला असतो…मग तुम्ही सुद्धा मनात सुमार शिव्या देऊन अन मुखावर हास्य ठेऊन “हो येतो” म्हणून आले असता… पण रूम वर आल्यावर तुम्ही सगळं विसरून गेलेले असता…उद्या तर संडेच आहे ह्या नादात मस्त मित्रांसोबत एन्जोय करत बसता… सकाळी सकाळी तुम्हाला गर्मी व्हायला लागते म्हणून तुम्ही अर्धवट झोपेतच उठता आणि मग तुम्हाला तुमच्या रूमीच्या बेड वर तो नाही तर त्याचा मित्र दिसतो…ह्याचा अर्थ की रूमी आणि त्याचा मित्र शेजारच्या मोठ्या रूम मध्ये बहुदा ऍडजस्ट झालेले असावेत, आणि हे सगळं करतांना कुणी तुमची झोप मोड नाही केली ह्याबद्दल तुम्ही रूमीचे, त्याच्या मित्रांचे आभार मानता आणि ए.सी. सुरु करून परत निद्राधीन होता…सकाळी ९:३० ला मात्र तुमची टी.एल. तुम्हाला न चुकता कॉल करते…तिचा नंबर बघून तुमची झोप तात्पुरती का होईना, उडून जाते…तुम्ही आपलं लगेच उठून, बस निघतच होतो कि ऑफिस साठी ह्या अविर्भावात खोटी घाई दाखवत आणि जबरदस्त व्हौइस मौडूलेषण करून (उगा समजायला नको ना तिला की आत्ताच उठलात म्हणून) तिला विचारता,

“हे, डिड यु रीच्ड ऑफिस??” (मनात … “मायला पोहचली की काय!!!”)

…तिकडून उत्तर येतं…“हे…नो…ऍक्चुअली आय कॉल्ल्ड यु टू टेल यु द्याट, आय विल बी रिचिंग देयर बाय १०:३०”

…तुम्ही सुटकेचा निश्वास टाकता…पण लगेच सावरून म्हणता…”ओके अबक सी यु देयर.

… फोन ठेवता आणि तुम्ही लगेच डोक्यात पल्यानिंग करता…“अर्धा तास तयारीसाठी आणि अर्धा तास पोहचायला…बस्स… १०:३० ला तिथे टच!!” …. डोक्याने ह्या साठी म्हणतो आहे कारण असली फालतू कामं तेच करत…पण मग लगेच मनातून आवाज येतो …

“बे म्याड झाला का? अबे वेळ बघ… वातावरण बघ… आणि दिवस बघ!… एसी सुरु आहे… पड थोडा वेळ!”

डोकं – “नाही…शक्य नाही…एकदा पडलो की पडलो…आधीचा अनुभव आहे आपला…गपचूप कामाला लागा.”

मन – “अरे राज्या कोण वेळेवर जातं भारतात? थोडा उशीर झाला तर काय होतं…ये पड मस्त…”

डोकं – “हेच तर बदलायचं आहे. साला लहान पासून वेळेवर गोष्टी करायचं ठरवतो आहे…आणि रोज असाच उशीर करतो…आज नाही…”

मन – “अरे बाबा, कोण एव्हढी दखल घेणार आहे तू वेळेवर पोहचण्याची… अप्रेझल लेटर आधीच तयार होऊन असतात…झोप घे थोडी…अशी अर्धवट झोप घेऊन जाऊन काही फायदा होणार नाही…काम पण नाही करू शकशील तिथे…त्यापेक्षा २ तास उशिरा जा पण फ्रेश होऊन जा मस्त…”

…आत्ता ह्यावेळी मनानी खतरनाक बाजी मारली असते…आणि इथे बरेच लोकांचं डोकं हरून गेलेलं असतं…पण तुम्ही ह्या प्रकारात मोडत नसाल तर मग हे संभाषण सुरु राहतं…
(ता.क. – मी हे माझ्यासारख्या आळशी माणसांबद्दल लिहितो आहे…वक्तशीर माणसांनी उगा जास्त डोकं न लावता निव्वळ वाचून काढावे…)

डोकं – “हे असच करून तर सवय झाली आहे साली रोज उशिरा जायची… आता तर पी.एम. सुद्धा म्हणतो की ‘उद्या वेळेवर येशील राज्या… क्लायन्ट कॉल आहे’. नाही! बस्स झाला आता…मला हे बदलायचं आहे. मी आज वेळेवर जाणार.”

मन – “जाऊन कोणता तीर मारणार बे तु? हिमालय घाठणार आहे का? लय मोठा कोडर नाही का तु? की गेल्या गेल्या इशू सोल्व करून टाकशील……झोप गपचूप!”

डोकं – “….”

मन – “अरे ५ मीनटांनी काय फरक पडणार आहे राज्या..”

….हे ५ मिनिट त्यावेळी जगातील सर्वात सुखाच्या क्षणासारखे भासतात…त्यामुळे हि गोष्ट डोक्याला सुद्धा लगेच पटते…

डोकं – “गोष्ट तर खरी आहे यार…५ मीन झोपुयात…तयारी करूया २५ मिनटात…”

…हे संपूर्ण संभाषण अगदी काही सेकंदात होतं आणि आणि तुम्ही परत बिछान्यावर पडता…आता झोप लागायलाच १० मीन लागून जातात…पुढचा जाग येतो १०:०५ ला…तुम्ही प्रवासाचा अर्धा तास पहिलेच कट करता आणि स्वतःला म्हणता…

“आज ऑटो नी जाईल…काही होतं नाही एखाद्यावेळी पैसे गेले तर?”

…खरं तर हे असं म्हणून किमान २० दिवस झाले असतात आणि तुमचे निदान काही हजार ऑटो मध्ये आधीच घुसलेले असतात…पण तरी आज शेवटचा दिवस म्हणून तुम्ही लगबगीने तयारी करायला लागता…पटकन ब्रश हातात घेऊन तुम्ही बेसिन कडे जातंच असता तर तितक्यात तुमची नजर टी.व्ही. वर पडते…

डोकं – “अबे आत्ता गाणे नको ऐकू!…लेट झाला आहे आधीच…”

मन – “सकाळी सकाळी काय गाणीच ऐकतो का माणूस?…मी न्युज पाहणार…”

तुम्ही टी.व्ही. सुरु करता…न्युज च्यानल वरून मुझिक वर येऊन, तिथून मुद्दाम लगेच पळ काढत स्पोर्ट्स वर जाता आणि मग तिथेही जुनीच मॅच दाखवत आहे म्हणून त्या च्यानल ला फुकट म्हणत एखादा मुव्ही लावता… तोही इंग्रजी…
रात्री दाखवलेला अंडरवर्ल्ड सकाळी पुन्हा प्रसारित होता असतो… केट बेकिंसेल कसली दिसते त्यात असे स्वतःला म्हणून तुम्ही तिथेच ब्रश करत बसता…
एक दोन सिन्स बघण्याचं समाधान मिळवून तुम्ही बेसिन कडे वळलेच असता कि तुमची नजर समोरच्या घड्याळावर पडते…

डोकं – “च्यायला २० मिनिट झाले कि पुरते!!”
(तुमचे माहित नाही पण मला नॉर्मली इतका वेळ तसाही लागतोच…)

तुम्ही लगबगीने ब्रश करून, तोंड धुवून, प्रातःविधी आटोपता, आणि अंघोळीला जाता. आता उन्हाळाच्या दिवसात थंड्या पाण्यानी आंघोळ करण्याची मजाच काही और असते…त्यात रविवार हा तर जॉब करणाऱ्यांसाठी स्पेशल बाथ घ्यायचा दिवस असतो…ह्या दिवशी मस्त शाम्पू लावून, पूर्ण अंगाला वापरता येईल इतका फेस शाम्पुतूनच काढून, नंतर मस्त कंडीशनर लावून आरामात गाणी म्हणत, तर कधी डे ड्रीमिंग करत माणूस आंघोळ करत असतो…तुम्हाला घाई असल्यामुळे तुम्ही मुद्दाम शाम्पू आणि कंडीशनर ला हाथ लावत नाहीत…तरीही अंघोळीला उशीर होतोच…बाहेर पडल्यावर तुम्हाला कळत…“मायला ११ तर इथेच वाजलेत!!”

तुम्ही धावतच बाहेर पडता आणि पहिला दुर्ष्टीपथात येणारा ऑटो पकडता आणि कसलाही भाव न करता उलट नेहमी पेक्षा १० रुपये जास्तीचा भाव करून ऑफिस साठी पळ काढता…

ऑफिसला पोहचायला ११:३० होतात…तुम्ही धावत पळत आय.टी. डिपार्टमेंट स्वतःचा ल्यापटॉप उचलता आणि स्वतःच्या डेस्क कडे पळता. तिथे गेल्यावर तुमच्या लक्षात येतं कि तुमची टी.एल. हि अजूनही आलीच नाही आहे…“हिच्या @#*$ &%#^!!!” म्हणून तुम्ही तूची आई बहिण केल्यावर, आपण मागच्या एका तासात काय काय मिस केलंय ह्याची उजळणी सुरु करता मनातल्या मनात…मग परत त्या टी.एल. ची ” @#*$ &%#^”…शेवटी मन थोडं शांत झाल्यावर तुम्ही ल्यापटॉप उघडून मेल चाळू लागता…
साधारण २० मिनीटांनी तुम्हाला टी.एल. चा कॉल येतो…

“हे ‘बकड’ ह्याव यु रीच्ड ऑफिस??”

(“नाही मेले! घरी बसलो आहे ताणून…!!”) पण तुम्ही अगदी नॉर्मल आवाजात – “यस ‘अबक’ आय एम इन ऑफिस नाऊ. इज इट गोइंग टू बी लेट फॉर यु??” (“हो म्हण फक्त तू मेले आता…!”)

“ऍक्चुअली आय एम मुविंग फ्रॉम माय प्लेस नाऊ, आय शुड बी देयर इन २० मिनिट्स.”

(“येतेच कशाला बाई तू???”) थोडं हसून – “ओके नो इश्युज ‘अबक’.”

…आता मात्र तुम्ही त्या टी.एल. सोबतच संपूर्ण बाई जातीचीलाच शिव्या घालणे सुरु करता… बायका कश्या कामात चोख नसतात इथून तर त्यांनी कामच करू नये आणि निव्वळ घरी बसून संसारात रमावं इथपर्यंत तुम्ही स्वतःलाच जोर जोरात सांगून टाकता…हे म्हणत असतांना तुम्हाला तुमच्या शाळेतली शिक्षिका आठवते जिने घटक चाचणीच्या उत्तरपत्रिकेचा संपूर्ण गठ्ठाच हरवला होता (भलेही तुम्हाला त्यात काही जास्त मार्क मिळणार नव्हते, पण तरीही …“गठ्ठा हरवलाच कसा बाई तू” म्हणून तुम्ही तिच्या नावाने बोंब ठोकली होती…तीही मित्रांमध्ये आणि पालकांसमोर फक्त…) …तुमच्या पालकांना बोलवून “तुमच्या पोराला सांभाळणं शक्यच नाही!… खोटं वाटत असेल तर शाळेत येऊन बघा, काय दंगा करतं तर हे!” असं सांगणारी तुमची हेड मास्तरीण आठवते (इथेही तुम्ही “पोरांना सांभाळणं होतं नाही तर कुणी सांगितलं तुला शाळेत येऊन शिकवायला…घरी बसायचं ना!”..म्हणून आपली चूक नाही तर ह्यांचीच आहे हे स्वतःला सांगून मोकळे झाले असता)… कॉलेज ल्याब मध्ये सगळ्यांसमोर तुम्हाला तिच्या टेबलाजवळ बोलावून मोठ्या आवाजात “दिढ महिना झाला ल्याब सुरु होऊन आणि तू अजून पहिलीच असाइनमेंट संपवली नाहीस….वैभव नापास व्हायचे आहे का तुला परीक्षेत!!??” असं म्हणणारी ती प्रवचनकर्ती मॅडम आठवते….इथेही तुमचीच चूक असतांना देखील “असाइनमेंट करण्याचा आणि पास होण्याचा काही संबंध तरी असतो का राव !…चायला येडपटच आहे बाई!” असं (मनात) म्हणून मोकळे झालेले असता…बोलतांना थुंकण्याची सवय असलेली शुर्पनखेची वंशज असलेली ती मेक्यानिकलची म्याडम आठवते जी शिक्षा म्हणून पोरांना पहिल्या बाकावर बसायला लावायची…वर्कशॉप च्या ब्याच मध्ये तुमच्या टीम मध्ये असलेली ती मुलगी आठवते जी उगा नाजूक असल्याचा आव आणून सगळी कामं तुमच्या कडून करून घायची (इथेडोक्यातून आवाज येतो “बे चांगली होती बे ती…जरनल्स द्यायची कि लिहायला!”…तेव्हा लगेच तुमचं मन म्हणतं “ए गप रे…आज चिडायचं आहे आपल्याला!”)…थोडक्यात पोरी/बायका ह्या कधीच कुठलं काम नीटपणे करू शकत नाही हे सिद्ध करण्यात तुम्ही जिंकलेले असता आणि आपण बरे पुरुष म्हणून जन्माला आलो ह्याचा अभिमान बाळगून परत नजर ल्यापटॉप कडे वळवता आणि तुमचं प्रोजेक्ट उघडता…रविवारच्या दिवसाची खासियत हि असते कि त्यादिवशी आणी-बाणी लागणार असेल आणी तुमच्या कामामुळे ती टळण्याची शक्यता असेल…किंवा कतरिना कैफ सलमान ला सोडून तुमच्या सोबत राहायला तयार असेल…अक्षय कुमार कॉमेडी करणं बंद करणार असेल…मंदिरा बेदी क्रिकेटवर कॉमेंट्री बंद करणार असेल…भाजप हिंदुत्व सोडणार असेल…ह्रितिक अक्टिंग सुरु करणार असेल…तरी तुम्ही रविवारी कवडीचा कोडींग करू शकत नाहीत…तरी उगा आपली प्रोजेक्ट ची विंडो ओपन करून तुम्ही ब्लॉग वाचन सुरु करता…तेव्हढ्यात तुमची टी.एल. येते…

आताही टी.एल. सुद्धा साधी सुधी टी.एल. नाही बरं का…एक तर हिला ऐकून घ्यायची सवय नाही कुणाची…इथे ऐकून घेणं म्हणजे कुणी तुमची काढत आहे आणि त्याचं तुम्ही ऐकून घेत आहात असा अर्थ होत नाही….इथे ऐकून घेणं म्हणजे हिला मुळातच कुणाचं ऐकून घायची सवय नाही आहे असा आहे…माणसाने कामाच्या ठिकाणीच बोलावे म्हणतात ना? मी भलेही त्यातला नाही…पण नसत्या ठिकाणी बोलणारा देखील नाही…हि ह्या दुसर्या प्रकारात मोडणारी आहे…हाडाची ‘च्याटर बौक्स’! …म्हणजे एखादा इश्यू असेल आणि एखाद्या सामान्य माणसाला तो समजायला जर ५ मीन लागत असतील, तर तोच इश्यू तुम्हाला हिला समजवून सांगायला तुम्हाला निदान एक तास भर तरी घालवावा लागेल. का? …कारण पहिले ४५ मिनिट तर ती ऐकणारच नाही कि काही इश्यू आहे म्हणून! …पी.एम. तर हिला कंटाळून गेलेला आहे, आणि त्याने आज काल काही काम असेल तर स्वतःच टीम ला जाऊन सांगणं सुरु केलं आहे, कारण हिच्याशी बोलण्यात वाया घालवायला वेळ नाही आहे त्याच्याकडे…

तरं हि असली टी.एल. तुम्हाला मिळाली म्हणून तुम्ही आधीच त्रासलेले असता…आणि आज अप्लिकेशन लेव्हल वरच तुमचं काम हिने हिचे ब्याक एन्ड चं काम संपवल्या शिवाय सुरु करता येत नसतं. आता हि बया आलीच १२:३० च्या सुमारास असते, तिला कामाला बसण्यात १:०० तरं वाजेलंच आणि तिचे काम संपता संपता निदान ४:०० तरं होतीलच, हे तुम्हाला पुरतं ठाऊक असतं. त्यानंतर तुम्ही काम सुरु कराल म्हणजे तुमचं पूर्ण दिवस ऑफिस मधेच जाईल हे तुम्हाला समजलं असतं…पण हिला जाऊन “तुम्ही लवकर काम संपवू शकता का म्याडम थोडं?…”(हे इंग्रजीत बरं का) विचारण्याची तुमच्यात हिम्मत नसते…कारण त्याने ४:०० चे ५:०० होईल हे तुम्हाला चांगलाच ठाऊक असतं…मग काय?…बाई जातीवर राग तरं तुम्ही आत्ताच काढला असतो, आणि तो क्षणिक राग आता संपला देखील असतो…त्यामुळे आता तुमची टी.एल. वर चीड चीड सुद्धा होतं नसते… उलट दुसरीकडे जॉब बघत असशील आणि इंटरव्यूसाठी ऑफिस च्या वेळेचा काही अडथळा होत असेल तरं मला सांगशील, मी म्यानेज करून घेईल असे हिनेच म्हटलं होतं हे तुम्हाला आठवतं…तब्येत बरी नसतांना उगाच प्यांट्री मधलं काही खाऊ नकोस, मी दोन दिवस तुझ्या साठी साधी डाळ आणि भात घेऊन येईल हेही म्हटलेलं आठवतं…मग उगा वेळ घालवण्यासाठी तुम्ही परत नेट उघडून चाट करायला कुणी मिळतं का ते बघता..पण लगेच तुमच्या लक्षात येतं कि रविवारी लाव्कार उठून ऑफिस ला येऊन नेट बसणारे भामटे तुम्हीच…इतर लोक छान कुलर, किंवा ए.सी. लावून पसरलेले असतात…मग तुम्ही तुमच्या आवडीचे ब्लॉग वाचणं सुरु करता, आवडलेल्या लेखांवर प्रतिसाद देऊनही जेव्हा तुमच्याकडे वेळ उरलेला असतो, तेव्हा तुम्ही दिवसभरात जे झालं ते लिहून काढता…एका मित्राला वाचायला देता…आणि त्याने प्रकाशित करायला होकार दिल्यावर, ब्लॉग वर छापून देता… 🙂