मी कोण?

मी वैभव टेकाम. 🙂

व्यवसायाने Software Engineer. iPhone साठी ‘आनंदाने’ applications बनविणारा…
आनंदाने या साठी म्हणतो आहे कारण मला माझं काम आवडतं, कामाला बसलो की बाकी सगळ्या गोष्टी विसरून जातो मी… workoholic म्हणू शकता मला.

सगळ्याच Software Engineers सारखं माझं पण पहिला प्रेम computerच आहे!  …कुणाला निराशेत/ ताणात/ रागात बियर आठवते, कुणाला चहा, कुणाला सिगरेट तर कुणाला जेवण… मला मात्र computer आठवतो … computer वर बसून थोडा वेळ काही तरी चाळे केले नाहीत तर दिवस पूर्ण झाल्या सारखा वाटत नाही मला. 🙂

तसा मी मनाने स्वच्छंदी…मनात येईल ते करणारा … मनाला पटेल तरच करणारा…
अशात बरेचदा चुका पण घडतात मनाकडून … पण त्यांची जाणीव साठवून पुढे जाणारा, चुकांमधून शिकणारा, पडलोच तर धडपडत उठणारा…असा मी.

भगवंताचे रुप अनेक सगळ्यांसाठी, कुणाला तो रामात दिसतो, कुणाला रावणात, कुणाला येशुत, कुणाला मूर्तीत तर कुणाला निसर्गात तर कुणाला प्रत्येक माणसात… ह्या विविध रुपांवर माझा तेव्हढा विश्वास नसला तरी त्या असीम ताकदीवर नक्की आहे जी नेहमी प्रत्येक गोष्टीत समतोल साधण्याचा प्रयत्न करते… तीच माझ्यासाठी ईश्वर, भगवंत, परमात्मा सगळं काही आहे.

दुसऱ्यांकडून प्रेरणा घायला आवडतं, आणि इतरांना पुढे जाण्यास प्रवृत्त करायला सुद्धा आवडतं… त्यामुळे बरेचदा स्वतःचे कंटाळवाणं तत्वज्ञान सांगून सतावत असतो मित्रांना… 😉

निसर्गाची सुंदरता खूप भावते मनाला, त्यामुळे डोंगरावर जाण्यात, गावाकडे नदीकाठी बसण्यात, समुद्र किनारी जाऊन लाटांचा आवाज ऐकण्यात, रात्री आकाशाच्या छतेखाली बसण्यात खूप आनंद मिळतो.

blog ह्या करिता लिहितोय कारण मनात असलेल्या सगळ्याच गोष्टी ऐकण्यासाठी प्रत्येक वेळी कुणीतरी मिळेलच ह्याची हमी नसते. परत मनात आतपर्यंत बसलेल्या गोष्टी/घटना ह्या कुणाला सांगण्यापेक्षा कागदावर उतरवणं सोपं असतं, आणि तेव्हा ते नीट मांडता सुद्धा येतं… तर काही गोष्टी अश्या असतात की डोक्यात आल्यात की वाटतं की सांगून टाकावं सगळ्यांना…
…इथे अश्याच गोष्टी मांडणार आहे… अगदी साध्या… सरळ… थेट मनातून आलेल्या… 🙂

आपल्यातलाच एक,
वैभव विलास टेकाम
इमेल : tekamvaibhav86@gmail.com
मोबाईल : 09538501571

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: